ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:53+5:302021-02-05T08:21:53+5:30
आष्टी : गेल्या दहा महिन्यापासून कोरोनामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प होती. परंतु शासनाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या ...

ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी
आष्टी : गेल्या दहा महिन्यापासून कोरोनामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प होती. परंतु शासनाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाळेमध्ये जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी तालुका युवा पत्रकार संघ व इतर संघटनांनी २ फेबुवारी रोजी आगारप्रमुख संतोष डोके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी शहरामध्ये येत असतात. सध्या कोरोना नियमाच्या अधीन राहून शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात येत आहेत. परंतु ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाळेमध्ये येण्यास उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगारप्रमुख संतोष डोके यांच्याकडे ही मागणी केली आहे.