अंबाजोगाईत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:26+5:302021-03-22T04:30:26+5:30

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांच्याच गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हप्तावसुलीचा केलेला आरोप ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना ...

Demand for resignation of Home Minister Anil Deshmukh in Ambajogai | अंबाजोगाईत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

अंबाजोगाईत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांच्याच गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हप्तावसुलीचा केलेला आरोप ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. या घटनेचा निषेध नोंदवत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली. रविवारी सकाळी आ. मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विविध कारणांनी संकटात सापडलेले आहे. कॅबिनेट मंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आ. नमिता मुंदडा यांनी केली. या आंदोलनात भाजपाचे युवानेते अक्षय मुंदडा, जिल्हा बँकेचे माजी संचालक हिंदुलाल काकडे, नगरसेवक सारंग पुजारी, अ‍ॅड. संतोष लोमटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, प्रशांत आदनाक, कल्याण काळे, अहमद पप्पुवाले, अमित जाजू, बाळासाहेब पाथरकर, शेख ताहेर, खलील मौलाना, महेश अंबाड, राहुल कापसे, योगेश कडबाने, विकास मुंडे, अजय राठोड, दिग्विजय लोमटे, अमोल पवार, गोपाळ मस्के यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

===Photopath===

210321\avinash mudegaonkar_img-20210321-wa0066_14.jpg

Web Title: Demand for resignation of Home Minister Anil Deshmukh in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.