परळीतून परभणी, औरंगाबादसाठी पॅसेंजर रेल्वेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:29+5:302021-02-08T04:29:29+5:30
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोविड विषाणूचा प्रभाव कमी होत असल्याने राज्यात रेल्वे प्रशासनाने काही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या ...

परळीतून परभणी, औरंगाबादसाठी पॅसेंजर रेल्वेची मागणी
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोविड विषाणूचा प्रभाव कमी होत असल्याने राज्यात रेल्वे प्रशासनाने काही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी आरक्षण करावे लागत आहे. आरक्षणाचे तिकीटही जास्त आहे. अचानक प्रवास करायचा असेल तर आरक्षण मिळत नाही. बसने प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. परळीहून परभणीला जाण्यासाठी ९५ रुपये तिकीट लागते. पॅसेंजर रेल्वेसाठी हे तिकीट फक्त १५ रुपये होते. जवळपास ८० रुपये अतिरिक्त भुर्दंड रेल्वे प्रवाशांना भरावा लागत आहे. परळीहून, परभणी, नांदेड, औरंगाबाद येथे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. या प्रवाशांचे आरक्षण तिकिटामुळे आर्थिक बजेट मात्र चांगलेच बिघडले आहे. अगोदरच लॉकडाऊन करण्यात आल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.