पाणंद रस्ते करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:32 IST2021-03-06T04:32:12+5:302021-03-06T04:32:12+5:30
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी बीड : चौसाळा येथील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे, ...

पाणंद रस्ते करण्याची मागणी
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
बीड : चौसाळा येथील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे उच्च दाबाने वेळच्या वेळी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी चौसाळा येथील विशाल तोडकर यांनी केली आहे.
खोलीकरण करावे
बीड : तालुक्यातील जे प्रकल्प कोरडे झाले आहेत, त्या प्रकल्पांमधील गाळ काढून खोलीकरण करावे, जेणेकरून पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यानंतर पाण्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात होऊन शेतकरी व परिसरातील नागरिकांना याचा फायदा होईल.
झुडपे काढावीत
चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा ते केज तालुक्यातील नांदूरघाट या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसून येत नाही. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. ही झाडेझुडपे काढण्याची मागणी होत आहे.