पथदिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:16+5:302021-03-23T04:36:16+5:30

मागील वर्षभरापासून ते आजतायगत कोरोना संकट कायम आहे. मालमत्ता व पाणी करवसुली करताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही ...

Demand for immediate start of streetlights | पथदिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी

पथदिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी

मागील वर्षभरापासून ते आजतायगत कोरोना संकट कायम आहे. मालमत्ता व पाणी करवसुली करताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही बीड नगर परिषदने महावितरणचा ३.५ कोटी रुपयांचा थकीत भरणा केलेला आहे.

बीड नगर परिषदने ऊर्जा संवर्धन २०१७अंतर्गत संपूर्ण बीड शहरात एलईडी पथदिवे बसविले आहेत. परंतु वीज खांबांना मीटर नसल्याने महावितरणकडून अंदाजे वीजबिल दिले जात आहे. त्यामुळे तत्काळ वीजमीटर बसवून पथदिवे तत्काळ सुरू करावेत किंवा काही ठिकाणी मीटर बसवून त्यानुसार इतर ठिकाणीचे देयके आकारणी करावी, अशी मागणी विद्युत सभापती पिंगळे यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी इतर नगरसेवकही उपस्थित होते. पुढील दोन दिवसांत पथदिवे सुरू करू, असे आश्वासन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी दिले.

Web Title: Demand for immediate start of streetlights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.