शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीसंदर्भात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिका-यांना ...

ठळक मुद्देबीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीसंदर्भात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकाºयांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर करण्याची केवळ घोषणा केली आहे मात्र प्रत्यक्षात बीड जिल्ह्यात दुष्काळ आणि टंचाई बाबत कोणत्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नाहीत. घोषणा नकोत तर कार्यवाही करा, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी तातडीची उपाययोजना करा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळुंके, सरचिटणीस अमरसिंह पंडित, अ‍ॅड. उषा दराडे, संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.नेहमीप्रमाणे या सरकारने दुष्काळाबाबत सुध्दा शेतकºयांची आणि दुष्काळग्रस्त जनतेची फसवणूक केली आहे. गंभीर दुष्काळ जाहिर केल्याची केवळ पोकळ घोषणा केली, मात्र प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्याच नाहीत, त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीबाबत कोणतीही प्रत्यक्ष उपाययोजना सुरु झाली नाही त्याचा जाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाला विचारण्यासाठी हे निवेदन देण्यात आले असून कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. पंडित यांनी यावेळी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळुंके, अ‍ॅड.उषाताई दराडे, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी आ.पृथ्वीराज साठे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, माजी आ.सय्यद सलीम, अ‍ॅड.डी.बी. बागल, युवकचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह सोळुंके, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, मनोहर डाके, गंगाधर घुमरे, अमर ढोणे, भाऊसाहेब डावकर, रमेश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना या शिष्टमंडळाने लेखी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून दुष्काळाची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष कार्यवाहीच्या सूचना अद्याप प्राप्त नाहीत, आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचिवल्या जातील असे आश्वासन अपर जिल्हाधिकाºयांनी दिले.विविध मागण्या : चारा डेपो सुरू करा; माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडाटँकर मंजुरीचे अधिकार तहसिलदार आणि गटविकास अधिकाºयांना द्यावेत, गोदावरी नदीवरील बॅरेज व बंधाºयांमध्ये पाणी सोडण्यात यावे, जिल्हाभरात जनावरांसाठी छावण्या आणि चारा डेपो सुरु करावेत,मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी म.ग्रा.रो.ह.यो. ची कामे तात्काळ सुरु करावीत, बोंडअळीचे अनुदान आण िपिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करावी, नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रु पये मदत करावी,फळबागा आणि ऊस शेतीला हेक्टरी १ लाख रु पये मदत करावी, जायकवाडी धरणातून ३ टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्यात यावे, कृषीपंपाचे विज बिल माफ करावे,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्क माफ करावे यांसह विविध मागण्यांचे लेखी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शासनाला देण्यात आले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसwater shortageपाणीटंचाईAgriculture Sectorशेती क्षेत्र