कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:52+5:302021-06-26T04:23:52+5:30

.... दोन लाख अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वागत बीड : दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक ...

Demand for filling up of posts of Junior Engineers | कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरण्याची मागणी

कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरण्याची मागणी

....

दोन लाख अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वागत

बीड : दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी अकरावी, बारावी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख असे दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टीमार्फत देण्याचा निर्णय राज्याचे सामाजिक न्यायामंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयाचे विविध सामाजिक संघटनांकडून स्वागत होत आहे.

.....

सौताडा घाटरस्ता दुरुस्तीची मागणी

पाटोदा : नगर - बीड रस्त्यावरील सौताडा घाटातील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केलेले नाही. सध्या घाटातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. घाटवळणावर रस्त्याला डांबरच राहिलेले नाही. येथे खडीमय रस्ता झाला आहे. या रस्त्यावर अनेक दुचाकीस्वारांना अपघात होत आहेत. वळणाच्या जागेवरचे कठडेदेखील तुटले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Demand for filling up of posts of Junior Engineers