पोलिसांची रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:41+5:302021-07-08T04:22:41+5:30
गैरसमज दूर करून लसीकरण करा अंबाजोगाई : कोरोना लसीकरणाबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. परिणामी अनेकजण लसीकरण करण्यास घाबरत आहेत. ...

पोलिसांची रिक्त पदे भरण्याची मागणी
गैरसमज दूर करून लसीकरण करा
अंबाजोगाई : कोरोना लसीकरणाबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. परिणामी अनेकजण लसीकरण करण्यास घाबरत आहेत. ग्रामीण भागात तर नागरिक लसीकरण करून घेण्याचे टाळत आहेत. अशा स्थितीत लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र, अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत असून काही धूळखात आहेत. परिणामी, ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन कामाचा बोजवारा उडाला आहे.
डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बहुतांश वॉर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेस ही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नाल्यांमध्ये फवारणी न केल्यास आजाराची साथ पसरू शकते.
वीजपुरवठा खंडित व्यावसायिक हैराण
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दररोज किमान दोन ते तीन वेळा वीज जात आहे. त्यामुळे लघु व्यावसायिकांवर ही याचा विपरित परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने याचा परिणाम रोजगारावर ही होत आहे.वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र जाधव यांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला
अंबाजोगाई : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून ते रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात असलेल्या मटण मार्केटमुळे त्या ठिकाणी मोकाट कुत्रे फिरत असतात. हे कुत्रे वस्तीत येतात व पायी जाणारे, सायकल व मोटारसायकल चालकांचा बरेचदा पाठलाग करतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.