विजेच्या तारा ताणून घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:36 IST2021-04-28T04:36:18+5:302021-04-28T04:36:18+5:30

गेवराई : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. विजेच्या तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे ...

Demand for extension of power lines | विजेच्या तारा ताणून घेण्याची मागणी

विजेच्या तारा ताणून घेण्याची मागणी

गेवराई : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. विजेच्या तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा ताणून घेण्याची मागणी होत आहे.

अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी

केज : शहरासह तालुक्यात सध्या अवैध व्यवसाय बोकाळले आहेत. आता तर मटक्याला विविध नावे दिली जात आहेत. या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील अवैध धंदे तत्काळ बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

भाजी मंडईत घाणीचे साम्राज्य

अंबाजोगाई : शहरातील मंडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सकाळी विक्रीसाठी येणारा भाजीपाला विक्री झाल्यानंतर उरलेल्या भाज्या तिथेच रस्त्यावर टाकल्या जातात. या भाज्या खाण्यासाठी मोकाट जनावरे मंडी बाजारात असतात. रस्त्यावर पडलेल्या या भाज्यांमुळे दुर्गंधी व माशा बसून घाण तयार होते.

बीड बसस्थानकात खड्ड्यांचा त्रास वाढला

बीड : येथील बसस्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे. परंतु, सद्य:स्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. एक मे नंतर बससेवा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने परिसरात खड्डे बुजविण्यासह डागडुजीचे नियोजन करावे, अशी मागणी आहे.

Web Title: Demand for extension of power lines