मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST2021-05-29T04:25:42+5:302021-05-29T04:25:42+5:30
... रस्त्यांवरील वीज रोहित्र हटवा बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध वीज रोहित्र आहेत. हे या रोहित्रामुळे वाहतुकीला ...

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
...
रस्त्यांवरील वीज रोहित्र हटवा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध वीज रोहित्र आहेत. हे या रोहित्रामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच हे रोहित्र उघडे असल्याने नागरिकांना, लहान मुलांंना धोका आहे. तरीे नगरपालिका, महावितरणने हे रोहित्र हटवून रस्ते खुले करावेत, अशी मागणीे होत आहे.
....
फळांना मागणी घटली
बीेड : लॉकडाऊन असल्याने टरबूज, खरबूज, आंबा फळांना मागणी घटली आहे. लॉकडाऊन असल्याने अनेक बंधने असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विकणे अडचणीचे झाले आहे. तसेच नागरिकांना रस्त्यावर येणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे फळांना मागणी घटली आहे. याचा फटका फळविक्रेते, शेतकरी यांना बसत आहे.
....
मजुरांना कामे नसल्याने उपासमार
बीड : अनेक हातांवर काम करून पोट भरतात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊन आहे. अनेक मजुरांना रोजगार नाही. यामुळे अनेक मजुरांची उपासमार होत आहे. तरी लॉकडाऊन शिथिल करावे, अशी मागणी होत आहे.
...