सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:22+5:302021-03-22T04:30:22+5:30
निवेदनात म्हटले आहे की, जालना रोड ते बाळासाहेब ठाकरे नगर, सेंट अॅन्स स्कूलच्या शेजारील रस्ता तसेच बार्शी नाका येथील ...

सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, जालना रोड ते बाळासाहेब ठाकरे नगर, सेंट अॅन्स स्कूलच्या शेजारील रस्ता तसेच बार्शी नाका येथील शासकीय दूध डेअरीसमोरील कांतागळेनगर हा मार्ग म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हे कळणे कठीण बनले आहे. तसेच नाली नसल्याने रस्त्यावरच पाणी साचत असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वयोवृद्ध, बालकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना तर तारेवरची कसरत केल्या प्रमाणे वाहन चालवावी लागत आहे. या भागातील रस्ता व नाली बांधकामाला गत विधानसभा निवडणूकपूर्व मंजूरी मिळूनदेखील अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचे काम झालेले नाही. दोन वर्षांपूर्वी या रस्ता कामाचा नारळ फुटूनदेखील काम होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगराध्यक्षांनी लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, जालिंदर कातांगळे, प्रेमचंद नहार, सूर्यकांत मुळे महाराज, रामनारायण जाधव यांनी केली आहे.