अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST2021-05-29T04:25:47+5:302021-05-29T04:25:47+5:30
मंडी बाजारात घाणीचे साम्राज्य अंबाजोगाई : शहरातील मंडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सकाळी विक्रीसाठी ...

अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी
मंडी बाजारात घाणीचे साम्राज्य
अंबाजोगाई : शहरातील मंडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सकाळी विक्रीसाठी येणारा भाजीपाला विक्री झाल्यानंतर उरलेल्या भाज्या तिथेच रस्त्यावर टाकल्या जातात. या भाज्या खाण्यासाठी मोकाट जनावरे मंडी बाजारात असतात. रस्त्यावर पडलेल्या या भाज्यांमुळे दुर्गंधी व माशा बसून घाण तयार होते.
विजेच्या तारा लोंबकळलेल्या
गेवराई : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. विजेच्या तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसापासून रखडलेली आहेत. दुरुस्तीची मागणी केली जात आहेत, तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका वाढत आहे.
बीड बसस्थानकात खड्ड्यांचा त्रास वाढला
बीड : येथील बसस्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे. परंतु, सद्यस्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे.