बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छतेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:27+5:302021-03-21T04:32:27+5:30
बीड : बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. तसेच भिंतीवरदेखील झाडेझुडपे उगवली आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास अडसर निर्माण ...

बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छतेची मागणी
बीड : बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. तसेच भिंतीवरदेखील झाडेझुडपे उगवली आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास अडसर निर्माण होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन नदीपात्र स्वच्छ करावे, अशी मागणी होत आहे.
सहयोगनगरातील कचरा उचलून न्यावा
बीड : शहरातील सहयोगनगर भागामध्ये धान्य गोदाम परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचत आहे. व्यापारी व परिसरातील नागरिकांकडून उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन कचरा वेळेवर उचलून न्यावा, अशी मागणी होत आहे.
शेततळ्याचे अनुदान देण्याची मागणी
चौसाळा : गत शासनच्या काळात ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवण्यात आली. या अंतर्गत शेतकऱ्यांनी तळे खांदले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्याचे अनुदान न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे तत्काळ अनुदान अदा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जिल्हाभरात ज्वारी काढणीला सुरुवात
बीड : ज्वारीचा यावर्षी पेरा दीड लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आला होता. ज्वारी काढणीला सुरुवात झाली असून, चांगले उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, गारपिटीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीची काढणी सुरू केली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.