शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

नुकसानीपोटी ५१५ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:54 PM

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ ...

ठळक मुद्देबीड जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ७ लाख ५६ हजार ९२६ हेक्टर बाधीत

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, यासाठी ५१४ कोटी ८० लक्ष ५४ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शासनाकडे पाठविला आहे.जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांमधून नुकसानभरपाई तात्काळ मिळावी, अशी माागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश गाव पातळीवरील यंत्रणांना दिले होते. या अनुषंगाने प्राप्त झालेली माहिती एकत्रित करून जिल्ह्यातील बाधित क्षेत्र, शेतकºयांची संख्या आणि नुकसान भरपाई देण्यासाठी अपेक्षित निधी यांची तालुकानिहाय माहिती यासोबत सादर करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतकºयांना अतिवृष्टीचा फटका बसला असून पेरणी झालेल्या ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत पीक हातातून गेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस , मका , बाजरी, ज्वारी, तूर, मूग, द्राक्ष , पपई ह्यासह विविध पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी कमीत कमी वेळेत पंचनामे करून अहवाल सादर केले आहेत. त्याबद्दल त्यांच्या कामाचे कैतूक सर्वत्र होत आहे.तालुकानिहाय मिळणारअशी नुकसान भरपाईगेवराई तालुक्यातील १ लाख ३६ हजार५२१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १२८५१० शेतकºयांसाठी ७९ कोटी ७७ लक्ष ५५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. बीड तालुक्यातील १ लाख ३४ हजार ३२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १३०९१८ शेतकºयांसाठी ८४ कोटी ७६ लक्ष २० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. केज तालुक्यातील १ लाख ०५ हजार २१६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १०१०१८ शेतकºयांसाठी ६७ कोटी ३१ लक्ष २५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. आष्टी तालुक्यातील १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ७४५४५ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. माजलगाव तालुक्यातील ७६ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६९०६६ शेतकºयांसाठी ४६ कोटी २६ लक्ष ६५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ७७ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ४७ कोटी ५६ लक्ष ३९ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. पाटोदा तालुक्यातील ६६ हजार ४५४ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७१६२ शेतकºयांसाठी ३३ कोटी ३९ लक्ष ९५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. परळी तालुक्यातील ६१ हजार १०१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ३८ कोटी २८ लक्ष ३३ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. शिरूर कासार तालुक्यातील ५४ हजार ५७६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७३१३ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८८ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. धारूर तालुक्यातील ४६ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ४५७६९ शेतकºयांसाठी २७ कोटी ३९ लक्ष २४ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. वडवणी तालुक्यातील ३३ हजार ५७१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ३२३३१ शेतकºयांसाठी १९ कोटी ४२ लक्ष २१ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र