शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बीड जिल्ह्यात पाच केंद्रांवर प्रसुतीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:52 AM

बीड जिल्ह्याच्या कानाकोप-यातून गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात यावे लागत होते. परंतु आता हे अंतर कमी करून जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, केज व नेकनुरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून प्रसुतीची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देतात्काळ मिळणार उपचार ; वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्याच्या कानाकोप-यातून गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात यावे लागत होते. परंतु आता हे अंतर कमी करून जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, केज व नेकनुरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून प्रसुतीची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नॉर्मल व सिझरचीही व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे तात्काळ उपचार मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय अशा ६५ केंद्रांवर स्त्री रोग तज्ज्ञांकडून गर्भवती महिलांवर तपासणी व उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या संकल्पनेतील ही संकल्पना आता राज्यासाठी एक मॉडेल ठरू पहात आहे. यामुळे आरोग्य विभागाची प्रतीमाही उंचावली आहे.

दरम्यान, जिल्हा रूग्णालय वगळता इतर शासकीय रूग्णालयांमध्ये सिझरची सुविधा उपलब्ध नव्हती. प्रसुती म्हणलं की नागरिकही महिलांना थेट जिल्हा रूग्णालयात आणत. यामध्ये त्यांना मोठ्या ‘कळा’ सहन कराव्या लागत होत्या. हाच धागा पकडून जिल्ह्यात चार सेंटर सुरू करुन रूग्णांना तात्काळ व जवळच उपचार मिळण्याबरोबरच त्यांची प्रसुती सुरक्षित व्हावी, यासाठी तज्ज्ञांची टिम नियूक्त केली आहे. गेवराई, केज, माजलगाव व नेकनुर येथेच महिलांची प्रसुती करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.आयुक्तांचे चॅलेंज स्वीकारलेआरोग्य आयुक्त डॉ.संजिव कुमार यांनी पुणे येथील दोन सेंटरवर प्रती महिन्याला २५ महिलांचे सिझर व १२५ महिलांची नॉर्मल प्रसुती होते. राज्यात हे अव्वल असल्याचे सांगितले. असे सर्व जिल्ह्यांमध्ये होणे अपेक्षित आहे, असे आयुक्तांनी सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारले होते. यामध्ये बीडचे सीएस डॉ.थोरात यांनी ‘आय अ‍ॅक्सेप्टेड चॅलेंज’ असे म्हणून हे चॅलेंज स्विकारले आहे. आता यामध्ये त्यांना किती यश येते, हे वेळच ठरवेल.

३१ डिसेंबरला अहवाल देऊगेवराई, माजलगाव, नेकनुर व केजमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती करून तेथेच प्रसुतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रूग्णांना जिल्हा रूग्णालयात येण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याला या चार सेंटरमध्ये २५ सिझर व १२५ नॉर्मल प्रसुती करून दाखवू. आमची टिम कामाला लागली आहे. ३१ डिसेंबरला आम्ही अहवाल देऊ.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जि.रू.बीड