देगलूरकर महाराजांची प्रवचनमाला स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:45 IST2021-02-27T04:45:19+5:302021-02-27T04:45:19+5:30
बीड शहरातील दत्त मंदिर, सुभाष रोड,बीड येथे मागील पंधरा वर्षांपासून नारदभक्तिसूत्र या विषयावरील गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या ...

देगलूरकर महाराजांची प्रवचनमाला स्थगित
बीड शहरातील दत्त मंदिर, सुभाष रोड,बीड येथे मागील पंधरा वर्षांपासून नारदभक्तिसूत्र या विषयावरील गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून प्रवचन मालेचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात होते. मागील वर्षी या प्रवचन मालेचा समारोप झाला होता. पण बीड शहरातील भाविकांच्या विशेष आग्रहास्तव तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन करण्यात येणार होते परंतु, महाराष्ट्रातील कोरोणा परिस्थिती आणि शासनाने केलेल्या विनंती वरून पुढील महिन्यातील होणारी एकनाथी हरिपाठ या विषयावरील प्रवचनमाला पुढील काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे श्री संत सद्गगुरू धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष प्रवीण इंगळे, ह.भ.प एकनाथ महाराज पुजारी, रामराजे राक्षसभुवनकर यांच्यासह प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.