गोपीनाथ मुंडे यांच्या टपाल पाकिटाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST2021-06-04T04:26:12+5:302021-06-04T04:26:12+5:30

परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून गुरुवारी केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून टपाल ...

Dedication of Gopinath Munde's postal envelope | गोपीनाथ मुंडे यांच्या टपाल पाकिटाचे लोकार्पण

गोपीनाथ मुंडे यांच्या टपाल पाकिटाचे लोकार्पण

परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून गुरुवारी केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून टपाल पाकिटाचे विमोचन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याहस्ते गुरुवारी दिल्ली येथे, तर गोपीनाथगडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रीतम मुंडे, खा. डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत एकाचवेळी करण्यात आले.

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी गोपीनाथगडावर हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बानवकुळे यांनी हिंगोलीहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याहून सहभागी झाले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे व खा. डॉ. भागवत कराड यांनी गोपीनाथ गडावर उपस्थित राहून, तर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. मुंबई प्रदेश कार्यालयातून केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनोद तावडे आदी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खा. प्रीतम मुंडे यांनी केले. यावेळी जे. पी. नड्डा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. मुंडे हे एक उत्तम वक्ता, कुशल संघटक आणि मेहनती नेते होते. गोरगरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, वंचित, पीडितांचा ते आवाज बनले, असे नड्डा म्हणाले.

मुंडे यांच्या कार्याचा गौरव करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. त्यांचे अचानक जाणे आमच्यासाठी वेदनादायी होते. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी धडपडणारा नेता आज आमच्यात नाही, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

मुंडे साहेबांचे जीवन संघर्षमय होते. भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी काम केले. सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. आतापर्यंत ते लोकांच्या मनामनात होते. आता टपाल तिकिटाच्या माध्यमातून घराघरात जातील. भारतीय डाक विभागाने त्यांचा जो गौरव केला आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदी, नड्डा व केंद्र सरकारचे मी आभार मानते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या

खा. सुजय विखे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. मोनिका राजळे, आ. मेघना बोर्डीकर, आ. तुषार राठोड, भीमसेन धोंडे, फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.

===Photopath===

030621\03bed_6_03062021_14.jpg

===Caption===

टपाल पाकिटाचे लोकार्पण

Web Title: Dedication of Gopinath Munde's postal envelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.