पाणीपातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:46+5:302021-06-23T04:22:46+5:30
अवाजवी वीज बिले बीड : गेल्या अनेक दिवसांपासून जे वीजबिल दिले जात आहे, ते अनेकदा रिडिंग न घेताच ...

पाणीपातळीत घट
अवाजवी वीज बिले
बीड : गेल्या अनेक दिवसांपासून जे वीजबिल दिले जात आहे, ते अनेकदा रिडिंग न घेताच दिले जाते. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी वीजबिल मोठ्या प्रमाणात येत आहेत. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
घंटागाडी येईना
अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहात आहे. गाडी नियमित व वेळेवर सोडून जागोगाजी स्वच्छतेची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खोलीकरण गरजेचे
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगाव या परिसरात असणाऱ्या पाझर तलावाचे खोलीकरण करावे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला, तरी या परिसरातील तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी होत आहे.
आवश्यक सेवेला इंधन द्या
अंबाजोगाई : संचारबंदी लागू असली, तरी शहरात दुचाकीवर विनाकारण फिरणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत, अशाच व्यक्तींना पेट्रोल द्यावे जेणेकरून नियम पाळले जातील.