शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:46 IST

खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

ठळक मुद्देमाहिती देण्यास टाळाटाळ : पावणेपाच लाख शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित; शेतकऱ्यांत संताप

बीड : खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांच्या जखमेवर विमा कंपनी मीठ चोळण्याचे काम करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकºयांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. अगोदरच दुष्काळात होरपळलेल्या शेतक-यांना पीक विमा भरल्यानंतरही तो मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या शेतकºयांनी विमा भरल्यानंतरही त्यांना मिळाला नाही, ते ओरिएन्टल इन्शुरन्स या कंपनीकडे विचारणा करण्यासाठी जातात. मात्र, येथील अधिकारी, विमा प्रतिनिधी शेतकºयांना अरेरावी करण्यासह त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने या कंपनीकडून शेतकºयांची थट्टा मांडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी विम्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीकडून शेतकºयांच्या तक्रारींचे निरसण केले जात नाही. तालुक्याच्या ठिकाणी निरसन होत नसल्याने शेतकरी बीडच्या मुख्य शाखेत येतात, येथील अधिकारी आमच्याकडे काही नाही, तुम्ही तालुका विमा प्रतिनिधीशी संपर्क साधा म्हणून कार्यालयातून काढता पाय घेण्याचे सांगत आहेत. या दोन्ही कोंडीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळ आणि त्यात विमा कंपनीकडून थट्टा केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच विम्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकºयांनी दिला आहे.सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षाजिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतक-यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकºयांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे.अद्यापही ३ लाख ४४ हजार ९४० शेतकºयांना विमा मिळालेला नाही. कंपनीला विचारणा केल्यास येईल-येईल, असे उत्तरे देतात, तर कृषी विभागाकडून आम्हाला याची काही माहिती नाही, असे सांगून हात झटकले जात आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा