एकाचा मृत्यू; ३८ नवे रुग्ण, १४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST2021-01-23T04:34:17+5:302021-01-23T04:34:17+5:30

जिल्ह्यात ६२८ कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. यातील ५९० अहवाल निगेटिव्ह आले तर ३८ बाधित निष्पन्न झाले. यात अंबाजोगाई ...

Death of one; 38 new patients, 14 coronary free | एकाचा मृत्यू; ३८ नवे रुग्ण, १४ कोरोनामुक्त

एकाचा मृत्यू; ३८ नवे रुग्ण, १४ कोरोनामुक्त

जिल्ह्यात ६२८ कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. यातील ५९० अहवाल निगेटिव्ह आले तर ३८ बाधित निष्पन्न झाले. यात अंबाजोगाई १०, आष्टी १, बीड १९, केज ३, माजलगाव १, परळी २ व शिरुर कासार तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या १७ हजार ४९९ झाली आहे. पैकी १६ हजार ७१६ जण कोरोनामुक्त झाले असून ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ९१ हजार ७४६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील तब्बल १ लाख ७४ हजार २४७ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.

Web Title: Death of one; 38 new patients, 14 coronary free