वृद्ध दाम्पत्याच्या आपसातील मारहाणीत पत्नीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:28 IST2017-08-06T16:28:29+5:302017-08-06T16:28:34+5:30

वृध्द पती- पत्नीच्या भांडणात ६० वर्षीय पत्नीचा मृत्यु झाला तर पती गंभिर जखमी आहे. पतीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

Death of a married couple of old married couples | वृद्ध दाम्पत्याच्या आपसातील मारहाणीत पत्नीचा मृत्यू 

वृद्ध दाम्पत्याच्या आपसातील मारहाणीत पत्नीचा मृत्यू 

ऑनलाईन लोकमत

गेवराई (जि. बीड), दि. ६ : संतोष नगर भागातील वृध्द दाम्पत्याच्या  भांडणात ६० वर्षीय पत्नीचा मृत्यु झाला तर पती गंभिर जखमी आहे. पतीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असुन या प्रकरणी गेवराई ठाण्यात पती विरूद्ध खुनाचा दाखल झाला आहे.

अर्जुन कोडिंबा धापसे (६५) व त्यांच्या पत्नी सरस्वती यांचा घरगुती कारणाने शनिवारी रात्री वाद झाला. वाद एवढा टोकाचा होता कि याचे पर्यवसान एकमेकांना मारहाणीत झाले. यात सरस्वती यांच्या गळ्यावर मार लागल्याने त्यांचा  जागीच मृत्यू झाला. तर अर्जुन धापसे गंभिर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पती-पत्नी मधील हा वाद एवढा टोकाला का गेला याच कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी गेवराई ठाण्यात माणिक आबुज यांच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असुन पत्नी चा मृत देह उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. के. तडवी  करत आहेत.

Web Title: Death of a married couple of old married couples