भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:27 IST2020-12-25T04:27:21+5:302020-12-25T04:27:21+5:30
बाबू आबाजी निरडे (वय ५२) मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मोटारसायकलस्वार तेलगावकडून स्वगावी ( एम एच ४४ ई ६४७४) निघाला ...

भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
बाबू आबाजी निरडे (वय ५२) मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मोटारसायकलस्वार तेलगावकडून स्वगावी ( एम एच ४४ ई ६४७४) निघाला असता परळीकडून बीडकडे भरधाव वेगात येणाऱ्या राखेच्या टिप्पर एम एच २२ एए ५५४४) त्यास समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर दुचाकीस्वार चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त टिप्परने मोटारसायकल स्वारास चिरडल्यानंतर महामार्गाशेजारील लिंबाचे झाडास जोराची धडक दिली. यात झाड मुळासकट उन्मळून पडले. ही घटना संगमनजदीक नर्मदा जिनिंगपासून हाकेच्या अंतरावर घडली. दिंद्रुड पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल होत मयतास शवविच्छेदनासाठी धारुर शासकीय रुग्णालयाकडे हलवले. अपघातानंतर रस्त्यावर दुतर्फा ट्रॅफिक जाम झाली होती पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदेसह पोलिसांनी वाहनांना वाट मोकळी करुन दिली.