दोघांचा मृत्यू; नवे १४७ रुग्ण तर १२१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:51+5:302021-06-23T04:22:51+5:30
जिल्ह्यात सोमवारी २,९१७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. यात १४७ पॉझिटिव्ह तर २७७० ...

दोघांचा मृत्यू; नवे १४७ रुग्ण तर १२१ कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी २,९१७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. यात १४७ पॉझिटिव्ह तर २७७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १२, आष्टी २९ , बीड ३१, धारुर ६, गेवराई १३, केज ११, माजलगाव ७, परळी ३, पाटोदा १४, शिरुर १५ व वडवणी तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९० हजार ७९२ इतका झाला असून, यापैकी ८७ हजार ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान २४ तासात २ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यात उपळी (ता. वडवणी) येथील ६५ वर्षीय महिला व डोणगाव (ता. केज) येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण बळींचा आकडा २ हजार ४६० इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.