दोघांचा मृत्यू; १०५ नवे रुग्ण तर ८५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:36 IST2021-08-27T04:36:56+5:302021-08-27T04:36:56+5:30

जिल्ह्यात ४ हजार ५६४ संशयितांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ४ हजार ४५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर, १०५ ...

Death of both; 105 new patients and 85 coronal free | दोघांचा मृत्यू; १०५ नवे रुग्ण तर ८५ कोरोनामुक्त

दोघांचा मृत्यू; १०५ नवे रुग्ण तर ८५ कोरोनामुक्त

जिल्ह्यात ४ हजार ५६४ संशयितांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ४ हजार ४५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर, १०५ जण बाधित आढळून आले. माजलगाव तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नाही हे विशेष. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ७, आष्टी ३८, बीड २५, धारुर ४, गेवराई २, केज ९, परळी ३, पाटोदा ५, शिरुरकासार १, वडवणी तालुक्यातील ११ जणांचा समावेश आहे. दिवसभरात ८५ जण कोरोनामुक्त झाले तर दोन मृत्यूची नोंद झाली. यात ६० वर्षीय महिला घळाटवाडी (ता. माजलगाव) व ८५ पुरुष किन्ही (ता. आष्टी) यांचा समावेश आहे.

....

दरम्यान, एकूण बाधितांची संख्या आता १ लाख ७६० झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ९७ हजार ४ इतका झाला आहे. बळींची संख्या २ हजार २ झाली आहे. सध्या १ हजार ५४ रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Death of both; 105 new patients and 85 coronal free