राजकीय दबावापोटी डीसीसी बँकेची निवडणूक होत नाही- राजेंद्र मस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:13+5:302021-01-13T05:27:13+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची बँक आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांना डीसीसी बँकेच्या निवडणुकीपासून दूर ढकलण्यामागे ...

DCC Bank election not held due to political pressure: Rajendra Muske | राजकीय दबावापोटी डीसीसी बँकेची निवडणूक होत नाही- राजेंद्र मस्के

राजकीय दबावापोटी डीसीसी बँकेची निवडणूक होत नाही- राजेंद्र मस्के

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची बँक आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांना डीसीसी बँकेच्या निवडणुकीपासून दूर ढकलण्यामागे सहकारमंत्री व पालकमंत्री यांना नेमके काय साध्य करायचे आहे? अशाप्रकारे घटनाबाह्य कृतीमुळे संशय निर्माण झाला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तत्काळ जाहीर करून आदेशाची पायमल्ली करणाऱ्या प्रवीण फडणीस (उपनिबंधक सहकारी संस्था बीड) यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडे दिले आहे. ४ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द करणे क्रमप्राप्त होते; परंतु केवळ राजकीय दबावापोटी हे घडले नाही. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून निवडणूक पुढे ढकलून घटना व नियमांची पायमल्ली करत आहेत, असा आरोपही मस्के यांनी केला आहे.

Web Title: DCC Bank election not held due to political pressure: Rajendra Muske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.