दासखेडमध्ये अंगारे-धुपारे...!
By Admin | Updated: April 19, 2015 00:50 IST2015-04-19T00:30:09+5:302015-04-19T00:50:23+5:30
विलास भोसले , पाटोदा अंधश्रध्दा विरोधी कायदा धाब्यावर बसवित तालुक्यातील दासखेड येथे शनिवारी भक्तीच्या नावाखाली अघोरी उपचारांचा बाजार भरला होता

दासखेडमध्ये अंगारे-धुपारे...!
मुंबई : कुर्ला-सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड ते विद्याविहार स्थानकाला (पश्चिम) जोडणारा रामदेव पीर मार्गाचा पहिला टप्पा शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुढील काम पूर्ण झाल्यानंतर कुर्ला ते विद्याविहार हे अंतर फक्त सात मिनिटांत पार करता येणार असून, त्यामुळे मुंबई-ठाणे शहरांना जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतुकीचा ताण काहीसा हलका होणार आहे.
पूर्व उपनगरांतील रस्ता विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत यासंबंधीची माहिती मागितली होती. १९ जानेवारी २०१० रोजी रामदेव पीर मार्गाचे आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टला ९८.४० कोटींचे काम देण्यात आले. हे काम २५ डिसेंबर २०१२पर्यंत पूर्ण होणार होते.
६० फूट रुंदीचा हा मार्ग प्रीमियर नाल्याहून जात असून, रेल्वेच्या भिंतीला लागून असलेल्या आणि आयटीआय, परिवहन महामंडळाच्या जागेतील झोपड्या बाधित होत आहेत. शिवाय या हद्दीतून जाणारी जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे २१ मार्च २०१४पर्यंत काम करण्याची मुदतवाढ देण्यात आली असून, रकमेत मात्र कोणतीही वाढ झालेली नाही, अशी माहिती यावर देण्यात आली. काही झोपड्यांचा अडथळा असल्याने पाच वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. रामदेव पीर मार्गादरम्यानच्या झोपड्या हटविण्यासाठी महापालिका दिरंगाई करीत होती. या प्रकरणाची माहिती महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना लेखी निवेदन पाठवून देण्यात आली. शिवाय कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला गती दिली. (प्रतिनिधी)