रस्त्यावर चेंबरचा खड्डा अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:09+5:302021-07-09T04:22:09+5:30
पिकांना मरता मरता तारले शिरूर कासार : पावसाने दडी मारली आणि कडक उन्हाने शेत पीक ही मरणाच्या उंबरठ्यावर असतानाच ...

रस्त्यावर चेंबरचा खड्डा अपघाताचा धोका
पिकांना मरता मरता तारले
शिरूर कासार : पावसाने दडी मारली आणि कडक उन्हाने शेत पीक ही मरणाच्या उंबरठ्यावर असतानाच बुधवारी हलकासा पावसाचे आगमन झाले आणि पीक मरता मरता वाचली असली तरी देखील मोठा पाऊस पडणे जरूरी असल्याचे बोलले जाते .
हरभरा भाव घसरले
शिरूर कासार : भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी हरभरा घरात ठेवला मात्र भावाचे फासे उलटे पडले आणि भाववाढ होण्याऐवजी त्यात घसरण सुरू झाली पाच हजार रूपये प्रति क्विंटल भाव होता आता चक्क चार हजार दोनशे सांगितला जातोय .
पीक कर्जाची गती वाढवावी
शिरूर कासार : खरीप हंगामाची पेरणी व मशागत शेतकऱ्यांनी मोठी कसरत करून पूर्ण केली पीक कर्ज घेण्यासाठी बॅंकेत रांगेत उभे राहून देखील नंबर येत नाही तर दुसरीकडे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कामाचा निपटारा होत नाही यात बॅंक व शेतकरी यांना दोघांनाही त्रासाला सामोरे जावे लागते ,पीक कर्ज लवकर देण्यासाठी गती वाढवावी, अशी मागणी शेतकरी करत आहे .
घरेलू माशा नियंत्रण तोडगा
शिरूर कासार : आषाढ महिना लागला रे लागला की घरोघर माशांचे मोहळ घोंगावत असते. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी धूर हा एक उपाय केला जातो. याशिवाय एक नवीन तोडगा आता प्रचलित होत आहे. घराच्या समोरच्या बाजूस एका पारदर्शी पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत पाणी व त्यात एक रूपयाचे नाणे टाकून लटकवल्यास माशांचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जाते. शास्त्रीय कारण काय असेल ते सांगता येत नसले तरी माशावर नियंत्रण मिळवता येते असे सांगितले जाते .सध्या या पिशव्या लटकवलेले दृश्य दिसून येते .
080721\img20210708101958.jpg
फोटो