रस्ते खोदल्याने वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:16+5:302021-06-03T04:24:16+5:30

... काटेरी झुडुपे वाढली अंबेजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. गेल्या वर्षी मोठ्या ...

Damage to vehicles due to digging of roads | रस्ते खोदल्याने वाहनांचे नुकसान

रस्ते खोदल्याने वाहनांचे नुकसान

...

काटेरी झुडुपे वाढली

अंबेजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडुपांची वाढ झाली. आता वाढलेली ही झुडुपे रस्त्यावर आल्याने दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना वाहन चालविताना मोठा त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडुपांमुळे इजाही झालेली आहे.

....

आठ तास वीजपुरवठ्याची प्रतीक्षा

अंबाजोगाई : नवीन कृषीपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली, परंतु अद्याप शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरूच आहे.

.....

कोरोनाविषयी जनजागृती

अंबाजोगाई : येथील आधार माणुसकीचा परिवाराच्या वतीने कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सदस्यांनी ग्रामीण भागात मास्कचा वापर केल्यास कोरोनावर कशी मात करता येते. याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कोरोनापासून बचाव कसा करायचा, उपाययोजना काय आहेत, याची सर्व माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

....

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली

अंबेजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांवर बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यांवरच ठाण मांडून बसत असल्याने, वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे जनावरे मुख्य रस्त्यातही आजूबाजूच्या व्यापारी संकुलात घुसूनही त्या परिसरात घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.

Web Title: Damage to vehicles due to digging of roads