पर्यावरणाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST2021-02-12T04:31:47+5:302021-02-12T04:31:47+5:30

रस्त्याची दुरवस्था बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी ...

Damage to the environment | पर्यावरणाची हानी

पर्यावरणाची हानी

रस्त्याची दुरवस्था

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथील रस्ता पूर्ण खराब झाला असून, रस्त्यावर गटारीचे पाणी वाहत आहे.

घाणीचे साम्राज्य वाढले

माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शहरात स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पांदण रस्ता करावा

बीड : तालुक्यातील बोरखेड येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे वेळोवेळी रस्ता करण्याची मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.

बेशिस्त पार्किंगाचा त्रास

परळी : शहरातील विविध बँकांसह सार्वजनिक ठिकाणी दुचाकींची गेल्या दोन दिवसांपासून अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनकोंडी वाढली आहे.

Web Title: Damage to the environment