दालमिलची झाडाझडती
By Admin | Updated: October 22, 2015 21:02 IST2015-10-22T21:02:28+5:302015-10-22T21:02:28+5:30
डाळीची साठेबाजी करून ती चढय़ा भावाने विक्री करण्यास जिल्हा पुरवठा विभागाकडून चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बुधवारी दालमिल व गोदामांची तपासणी झाली.

दालमिलची झाडाझडती
बीड : डाळीची साठेबाजी करून ती चढय़ा भावाने विक्री करण्यास जिल्हा पुरवठा विभागाकडून चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये बुधवारी दालमिल व गोदामांची तपासणी झाली. दिवसभरात जवळपास २५ ते ३0 दालमिल व गोदामांची तपासणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डाळींची साठेबाजी केली जात असल्यामुळे डाळींचे भाव गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत २00 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. विशेषम्हणजे विविध प्रकारच्या दाळी काळ्या बाजारातही पाठविल्या जात आहेत. या अनुषंगाने साठेबाजी करणार्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री बीडजिल्ह्यातील तीन ठिकाणी तपासण्या झाल्या होत्या. त्यानंतर तपासणी सत्र बुधवारीही कायम राहिले. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पथकांमार्फत जवळपास २५ ते ३0 ठिकाणी गोदाम व दालमिलची तपासणी करून त्या ठिकाणी अतिरिक्त साठा आहे का ? परवाना आहे का ? याची चाचपणी करण्यात आली. या संदर्भात पुरवठा विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले की, दालमिल व गोदामाची तपासणीची प्रक्रिया पुढील काळात सुरूच राहणार आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त साठा किंवा परवाना नसेल अशांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी) ■ गेवराई शहरातील मोंढा भागातीलआडत दुकानाची महसूल विभागाच्या वतीने बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास तपासणी करण्यात आली. यात यात पार्थ ट्रेडिंग कंपनीमध्ये ३00 क्विंटल विना परवाना हरभरा डाळ आढळून आली. ही डाळ जप्त करण्यात आली असून गोदामाला सील करण्यात आले आहे.
■ गेवराई शहरातील मोंढा भागातील आठ आडत दुकानाची महसूल विभागाच्या पथकाने तपासणी केली. पथकामध्ये तहसीलदार एम. व्ही. काळे, मंडल अधिकारी पी. डी. येवले, देशमुख, संजय राजपूत, पी. सी. तांबडे, उमेश कुडदे यांचा समावेश होता.