विठ्ठल मंदिरात दहीहंडी काला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:16+5:302021-07-24T04:20:16+5:30
शिरूर कासार : येथील विठ्ठल मंदिरात शुक्रवारी सकाळी गुरू पौर्णिमा व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...

विठ्ठल मंदिरात दहीहंडी काला
शिरूर कासार : येथील विठ्ठल मंदिरात शुक्रवारी सकाळी गुरू पौर्णिमा व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वारकरी लोटांगण, फुगडी, फेर, कोंबडा,नमस्कार, झिम्मा आदी खेळ खेळत बालगोपालांनी आनंद लुटला.
प्रतिवर्षी विठ्ठल मंदिरात एकादशी ते पौर्णिमेपर्यंत विठ्ठल पुजारी हरिदास मंडळ सायंकाळी दिंडी नगर प्रदिक्षणा करीत असतात. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी डाव मांडीला’ यासारखी भजने गात दिंडी निघते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी या आनंदावर कोरोनाने विरजण टाकले असले तरी अल्प प्रमाणात का होईना परंपरेत खंड नको म्हणून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
‘झाले रामराज्य काय उने आम्हासी’ या अभंगावर टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी खेळ, फुगडी, झिम्मा, लोटांगण, कोंबडा, नमस्कार आदी खेळ खेळले. यात भाऊसाहेब हरिदास, अशोक हरिदास, अमोल चोरमले, कृष्णा काळे, पांडुरंग हरिदास, ओंकार हरिदास, विशाल, अक्षय, हरिप्रसाद, आकाश हरिदास, मुक्ताबाई हरिदास, शोभा चोरमले, वैशाली हरिदास, सत्यभामा हरिदास यांच्यासह बालगोपाल सहभागी झाले होते. खेळानंतर बालगोपालांना दहीलाह्या काला व भंडाऱ्याचा प्रसाद देण्यात आला.
भामाबाई डोंगरे यांचे प्रवचन
प्रत्येक वर्षी काल्याच्या दिवशी विठ्ठल मंदिरात कीर्तन होत असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे गर्दी न करता भामाबाई डोंगरे यांची प्रवचन सेवा झाली.
230721\img-20210723-wa0032.jpg
फोटो