सायबर भामट्यांनी कर सल्लागाराला गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:52+5:302021-06-03T04:23:52+5:30

बीड : ॲप डाऊनलोड करायला सांगून सायबर भामट्यांनी शहरातील कर सल्लागाराला १ लाख ६० हजाराला गंडविले. याप्रकरणी शहर पोलीस ...

The cyber hackers ruined the tax advisor | सायबर भामट्यांनी कर सल्लागाराला गंडविले

सायबर भामट्यांनी कर सल्लागाराला गंडविले

बीड : ॲप डाऊनलोड करायला सांगून सायबर भामट्यांनी शहरातील कर सल्लागाराला १ लाख ६० हजाराला गंडविले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील सार्वजनिक वाचनालयाजवळ राहणारे व्यवसाय कर सल्लागार सत्यनारायण छगनलाल लोहिया यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने ९१८३८८९८१५६४ या क्रमांकाच्या मोबाईलवरून संपर्क करून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादी लोहिया यांनी ते ॲप डाऊनलोड केले असता, त्या ॲपद्वारे लोहिया यांच्या एसबीआयच्या खात्यातून ९५ हजार, १० हजार, १० हजार, ५ हजार, २० हजार, २० हजार याप्रमाणे सहा व्यवहारातून १ लाख ६० हजार रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर लोहिया यांनी शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४२० भादंविसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सानप करीत आहेत.

Web Title: The cyber hackers ruined the tax advisor