पोदार स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:38 IST2021-08-20T04:38:30+5:302021-08-20T04:38:30+5:30

बीड : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी ऑनलाइन पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम ...

A cultural program was held at Podar School | पोदार स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगला

पोदार स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगला

बीड : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी ऑनलाइन पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. प्रारंभी प्रतीक्षा जोहरी यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळेतील मोजकेच शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांनी हा कार्यक्रम युट्युब लाईव्हद्वारे ऑनलाईन पाहिला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत, नाटक, व नृत्य हे सर्व प्रकार ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आले. पालकांनी प्रतिसाद देत कौतुक केले.

या कार्यक्रत ज्या शिक्षकांनी संस्थेत आपल्या सेवेची पाच वर्षे पूर्ण केली, त्यांचा रॉयल्टी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सीबीएसई. बोर्ड २०२० मध्ये जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवलेले तसेच एपीजे अब्दुल कलाम स्टुडन्ट ऑफ द इयर घोषित झालेले विद्यार्थी स्नेहा शिंदे, श्रुती वीर, आणि ऋत्विक मुळे यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. प्राचार्या प्रतीक्षा जोहरी यांनी गुणवंत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

180821\220718_2_bed_22_18082021_14.jpg

पोदार स्कूल

Web Title: A cultural program was held at Podar School