शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गेटकेन ऊस बंद करून कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:35 IST

माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमागील हंगामातील थकबाकी अदा करा : शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, जय महेश शुगर इंडस्ट्रीज आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांकडून २६५ जातीचा ऊस नेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. मात्र त्यावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. २६५ जातीचा ८ लाख टन ऊस सध्या उभा आहे. २६५ जातीचा ऊस नेण्यास कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. गाळपासाठी कारखाने गेटकेन ऊस आणत आहेत. परिणामी कार्यक्षेत्रातील २६५ जातीचा ऊस वेळेत गाळपासाठी गेला नाही तर वाळण्याची शक्यता आहे. गेटकेन ऊस बंद करुन तिन्ही कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्यास प्राधान्य द्यावे, यासाठी प्रशासनाने सूचना करावी अशी मागणी थावरे यांनी केली आहे.२६५ जातीचा ऊस गाळपास न्यावा, शेतकºयांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी माजलगाव येथील परभणी चौकात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.२६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ२६५ जातीचा ऊस गाळपासाठी न्यावा म्हणून शेतकºयांनी पुणे येथील साखर आयुक्तांकडे तक्रार करुन औरंगाबाद येथे साखर सहसंचालकांना घेराव घातला होता.त्यानंतर तिन्ही कारखान्यांनी हा ऊस नेण्याबाबत पत्र दिले होते. मात्र आता कारखाने ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहेत.मागील वर्षी गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकºयांचे माजलगाव कारखान्याकडे प्रती टन ८००, छत्रपती कारखान्याकडे ७०० रुपये तसेच जयमहेशकडे ४५० रुपयेप्रमाणे उसाचे बील थकलेले आहे.प्रशासनाने सूचना केल्यानंतरही कारखान्यांनी कार्यवाही केली नसल्याचे थावरे म्हणाले. किमान दुष्काळाचे भान राखत कारखान्यांनी या रकमेचे वाटप करुन पालनकर्ते असल्याचे दाखवून द्यावे असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस न घेण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी ८६०३२ जातीच्या उसाची लागवड केली; हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. शेतातील उसाचे आता करावे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन