वाघाच्या वाड्यात सीआरपीएफ जवानाचा गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST2021-04-10T04:32:56+5:302021-04-10T04:32:56+5:30
कुसळंब : जागेच्या कारणावरून झालेल्या तंट्यामधून चक्क स्वतःच्या पिस्टलमधून दोन राऊंड फायर करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवानासह दोघांवर ...

वाघाच्या वाड्यात सीआरपीएफ जवानाचा गोळीबार
कुसळंब : जागेच्या कारणावरून झालेल्या तंट्यामधून चक्क स्वतःच्या पिस्टलमधून दोन राऊंड फायर करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवानासह दोघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाटोदा तालुक्यातील वाघाची वाडी गावात ८ एप्रिल रोजी ही घटना घडली.
बन्सीधर प्रल्हाद दुरंडे यांनी दिलेल्या तक्रारीत मच्छिंद्र जालिंदर दुरुंडे व महादेव सखाराम मस्कर यांनी प्रथम प्रकाश जाधव यांच्या घराची भिंत पाडली व नंतर बन्सीधर यांच्या घरी जाऊन प्रकाश जाधव यास राहण्यासाठी जागा का दिली ? असे कारण काढून बन्सीधरच्या दिशेने जिवे मारण्याच्या उद्देशाने मच्छिंद्र दुरुंडे याने त्याच्याकडील पिस्टलमधून दोन राऊंड फायर केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जिवे मारण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण केल्याप्रकरणी तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सीआरपीएफमधील जवान मच्छिंद्र हा आपल्या मूळ गावी सुटीवर आला होता. या घटनेचा तपास पाटोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोळेकर, बीट अंमलदार तांदळे, तांबे, मोटे हे करत आहेत.