लग्नसमारंभास गर्दी, मंगल कार्यालयाला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:29+5:302021-03-10T04:33:29+5:30
गेवराई : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यात लग्नसमारंभ व ...

लग्नसमारंभास गर्दी, मंगल कार्यालयाला दंड
गेवराई : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम करण्यासाठी मोजक्याच लोकांना परवानगी आहे. मात्र, या आदेशाची पायमल्ली करून गर्दी जमविल्याप्रकरणी येथील कोल्हेर रोडवरील एका मंगल कार्यालय मालकास १० हजार रुपये दंड आकारण्यात आला. नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. त्यामुळे मंगल कार्यालय मालक व आयोजकांचे धाबे दणाणले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने व याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काही दिवसांपूर्वी जमावबंदी आदेश जारी केले. त्यात लग्नसमारंभासह विविध कार्यक्रमांना मोजक्याच लोकांना परवानगी दिली असताना शहरातील कोल्हेर रोडवरील बेदरे यांच्या मंगल कार्यालयाच्या ठिकाणी रविवारी एक लग्नसमारंभ होता. त्यामुळे मोठी गर्दी जमा झाली होती. याची माहिती नगरपरिषद, तहसील कार्यालय व पोलिसांना समजल्यावर याविरुद्ध संयुक्त कारवाई करण्यात आली. गर्दी जमविल्याप्रकरणी मंगल कार्यालय मालकास १० हजार रुपये दंड आकारण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील मंगल कार्यालय चालकांचे धाबे दणाणले आहे.