विषाणूजन्य आजाराने उपचारास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST2021-03-07T04:31:16+5:302021-03-07T04:31:16+5:30
गस्त वाढवावी बीड : शहरातील बाजारपेठा सध्या खरेदीसाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी गजबजून गेल्या आहेत. याच गर्दीचा फायदा घेऊन भुरटे ...

विषाणूजन्य आजाराने उपचारास गर्दी
गस्त वाढवावी
बीड : शहरातील बाजारपेठा सध्या खरेदीसाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी गजबजून गेल्या आहेत. याच गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोरही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. या चोरांवर अंकुश राहील, नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील या रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी आहे.
स्वच्छतागृह अस्वच्छ
बीड : शहरात नगरपालिकेकडून स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे; मात्र स्वच्छता न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
हायवे काम अपूर्ण
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर मार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याकडेला असलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरूंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: या भागात शासकीय कार्यालय असल्याने सतत वाहतूक असते. त्याच दरम्यान कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीची मात्र कोंडी होते.
मार्गदर्शनाची गरज
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कापसावर अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासनाने यासंदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी अरविंद जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.