निराधारांची टपाल कार्यालयात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:36+5:302021-06-19T04:22:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील टपाल कार्यालयात निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाल्याने ही रक्कम काढण्यासाठी निराधार ...

Crowds of homeless people at the post office | निराधारांची टपाल कार्यालयात गर्दी

निराधारांची टपाल कार्यालयात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : येथील टपाल कार्यालयात निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाल्याने ही रक्कम काढण्यासाठी निराधार गर्दी करत आहेत. मात्र येथे कोरोनाच्या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून आले. या गर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे नियमांचे मात्र तीन तेरा वाजल्याचे सर्रास दिसत आहे.

धारूर येथील टपाल कार्यालयात ज्या निराधारांचे अनुदानासाठी खाते आहेत. त्यांचे अनुदान तहसील कार्यालयाने या खात्यावर जमा केले. हे अनुदान काढण्यासाठी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी येथील टपाल कार्यालयासमोर दोन दिवसांपासून गर्दी करत असून जत्रेचे स्वरूप आले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टपाल कार्यालयाकडून कोणतेच नियोजन केलेले नसून होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धाेका नाकारता येणार नाही.

===Photopath===

180621\img-20210617-wa0082.jpg

===Caption===

टपाल कार्यालया समोर निराधाराची गर्दी

Web Title: Crowds of homeless people at the post office