शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:46 IST

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे; धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

परळी  (बीड) : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सामाजिक कार्यकर्ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केली जावी. तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे केली आहे. गुरुवारी  लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याविषयी आपले मत व्यक्त केले. 

आमदार धनंजय मुंडे पुढे म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी व गंभीर स्वरूपाचे आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी ही समाज विघातक असून अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे, यासाठी या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे असे, मत आमदार मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच गुन्हेगारी ही एक अपप्रवृत्ती आहे, तिला जात नसते, मात्र या प्रकरणाचा आडून काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. या माध्यमातून काहीजण राजकीय लाभ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

नाहक बीड जिल्ह्याची बदनामी करू नयेपवनचक्कीच्या संदर्भातील कामाच्या वादातून ही हत्या झाल्याचे समजते, मात्र जाणीवपूर्वक याआडून बीड जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा तसेच न्यायव्यवस्था या माध्यमातून संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल, कुणीही नाहक जिल्ह्याची बदनामी करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCrime Newsगुन्हेगारीBeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस