बीड शहरात तलवारीने हल्ला करणा-या सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:26 IST2018-02-16T23:25:53+5:302018-02-16T23:26:00+5:30
बीड : शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात विद्यार्थ्यांवर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा ...

बीड शहरात तलवारीने हल्ला करणा-या सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा
बीड : शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात विद्यार्थ्यांवर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मुन्ना ऊर्फ सतीश दुधाळ, राजू दुधाळ, भारत मणेरी, प्रीतम दुधाळ, आकाश जाधव व अन्य एक अल्पवयीन अशी आरोपी विद्यार्थ्यांची नावे आहेत. प्रतीक श्रीधर दोडके व उमेश अशोक पांढरे (दोघेही रा. बीड) हे दोघे त्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. या दोघांवरही सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आठवडाभरापूर्वी प्रतीक व उमेशचे राजूसोबत महाविद्यालयात किरकोळ वाद झाला. याचे रुपांतर मारहाणीत झाले.
याप्रकरणी राजूच्या फिर्यादीवरुन प्रतीकसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हाच राग मनात धरुन गुरुवारी दुपारी राजूसह सहा विद्यार्थ्यांनी नाट्यगृह परिसरात उमेश व प्रतीकला अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये दोघेही जखमी झाले. शिवाजीनगर ठाण्यात या सहांही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी सांगितले.