लोकमत न्यूज नेटवर्कसिरसाळा : दुष्काळग्रस्त तसेच शेतकºयांच्या विविध प्रश्नांवरून परळी तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरूवारी येथील मुख्य चौकात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली.१९७२ पेक्षा अधिक या वर्षी दुष्काळ स्थिती आहे. शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी केंद्र, राज्य सरकार हे नाही त्या गोष्टीवर राजकारण करत असल्याचा आरोप निदर्शनकर्त्यांनी केला. तसेच पाण्याअभावी वाळत चाललेला ऊस तात्काळ गाळप करावा, जनावरांना दावणीला चारा उपलब्ध करून दयावा, रोजगार हमीची काम सुरू करण्यात यावीत, गाव तिथं पिण्याच्या पाण्याची सोय करावी, प्रती कार्ड धारकाला ३५ किलो धान्य देण्यात यावे, हेक्टरी ५० हजार रुपये शेतकºयांना अनुदान देण्यात यावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी एस ए पुसदेकर, तलाठी युवराज सोळंके यांना देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ.पी.एस. घाडगे, जिल्हा सचिव कॉ. उत्तमराव माने, डीवायएफआईचे अॅड. अजय बुरांडे, पं.स. सदस्य सुदाम शिंदे, गंगाधर पोटभरे, मदन वाघमारे, भगवान बडे, मुरलीधर नागरगोजे, यांच्यासह माकपचे कार्यकर्ते हातात लाल झेंडे घेऊन सहभागी झाले होते.
सिरसाळ्यात माकपची दुष्काळप्रश्नी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:52 IST
दुष्काळग्रस्त तसेच शेतकºयांच्या विविध प्रश्नांवरून परळी तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरूवारी येथील मुख्य चौकात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली.
सिरसाळ्यात माकपची दुष्काळप्रश्नी निदर्शने
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या घोषणा : केंद्र, राज्य सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप