माजलगावात कोविड लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:39+5:302021-02-05T08:23:39+5:30
: कोविड-१९ लसीकरणाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली.लसीकरणाच्या रिॲक्शन बाबतीत कर्मचाऱ्यांसह इतरांत धाकधूक व दडपण असल्याचे लक्षात आल्याने ...

माजलगावात कोविड लसीकरणाला सुरुवात
: कोविड-१९ लसीकरणाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली.लसीकरणाच्या रिॲक्शन बाबतीत कर्मचाऱ्यांसह इतरांत धाकधूक व दडपण असल्याचे लक्षात आल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांनी स्वतःपासून लसीकरणाची सुरुवात केली. दुपारपर्यंत ५० जणांचे लसीकरण झाले होते. ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचे ३ कक्ष उभारले आहेत.यात पहिल्या प्रतीक्षा कक्षात रुग्णांची नोंदणी,दुसऱ्या कक्षात लसीकरण, व तिसऱ्या महत्त्वपूर्ण कक्षामध्ये लस घेतलेल्यांवर निगराणी ठेवली जात आहे. अधीक्षक डॉ.सुरेश साबळे, डॉ.जी.आर.देशपांडे, डॉ. श्रीयेश देशपांडे, डॉ.सारंग कुलकर्णी यांच्यासह अंगणवाडी ताई आदी ५० जणांनी लस घेतली.
धाकधूक होती परंतु काहीच झाले नाही
लस घेतल्यानंतर काही होणार नाही याची खात्री होती. परंतु माध्यमांमधून कानावर पडणाऱ्या बातम्यांमुळे लसीकरणाच्या रिॲक्शनची भीती व दडपण होते.परंतु लस घेतल्यानंतर कुठलीच रिॲक्शन आली नाही. त्यामुळे इतरांनी लसीची भीती न बाळगता लसीकरणास सामोरे जावे असे आवाहन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रेयश देशपांडे यांनी केले.