वाळू उपशाला आवर घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:29+5:302021-02-05T08:29:29+5:30

रस्त्यावर खड्डे; वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी, आदी गावांतील ...

Cover with sand | वाळू उपशाला आवर घालावा

वाळू उपशाला आवर घालावा

रस्त्यावर खड्डे;

वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप

बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी, आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तासन्‌तास वीज गायब राहत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणने यावर योग्य ती कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोंडवाडा

दुरुस्तीकडे दुर्लक्ष

बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था

बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. म्हणून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Cover with sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.