तरुणाच्या धाडसाने विहिरीत बुडणाऱ्या चिमुकल्यास मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:58 PM2020-04-13T17:58:59+5:302020-04-13T18:00:06+5:30

रविवार पेठेतील जुन्या विहिरीत पडले दोन वर्षीय बालक

With the courage of the young man, the life of the two year boy drowned in the well | तरुणाच्या धाडसाने विहिरीत बुडणाऱ्या चिमुकल्यास मिळाले जीवनदान

तरुणाच्या धाडसाने विहिरीत बुडणाऱ्या चिमुकल्यास मिळाले जीवनदान

Next
ठळक मुद्देजीवाची पर्वा न करता घेतली विहिरीत उडी

अंबाजोगाई -  दोन वर्षीय बालक खेळत खेळत विहिरीजवळ गेला. विहिरीच्या पायऱ्या उतरत आत गेला असता तो पाण्यात कोसळला. शेजारी राहणाऱ्या महिलेला त्या बालकाचा आवाज कानावर आला. कसलीही जीवाची पर्वा न करता अर्थवने पाण्यात उडी मारून त्या दोन वर्षीय बालकाला पाण्याबाहेर काढले व त्याला जीवदान दिले.  हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच वाजता रविवार पेठ परिसरातील सरस्वती तीर्थ येथे घडला. 

                येथील रविवार पेठ परिसरात बालाजी मंदिर परिसरात सरस्वती तीर्थ नावाची जुनी विहिर आहे. ही विहिर प्राचीन काळातील असून या विहिरीला कसलेही कठडे नाहीत. त्यामुळे ती विहिर या परिसरात धोकादायक बनलेली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास याच परिसरात राहणारा सय्यद जहिर सय्यद हाफीस (वय - २ वर्षे) हा बालक खेळत खेळत विहिरीकडे गेला. विहिरीच्या पायऱ्या उतरत उतरत  तो खाली उतरला. अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्यात पडत असतांना त्याचा मोठा आवाज झाला. विहिरीच्या शेजारी राहणाºया प्रणिता विनय जहागिरदार यांनी त्या बालकाचा आवाज ऐकला. त्यांनी आपला मुलगा अर्थव यास तात्काळ ही माहिती दिली. अर्थवनेही कसलाही विचार न करता विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणाºया त्या बालकास बाहेर काढले व त्याचा जीव वाचविला. अर्थव विनय जहागिरदार हा १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  आपल्या बालकाला जीवदान दिल्याबद्दल  हाफीस यांनीही जहागिरदार कुटुंबियांचे आभार मानले.

Web Title: With the courage of the young man, the life of the two year boy drowned in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.