एन. सी.सी.काॅटन जिनिंगमध्ये विशाल ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करण्यात येते. या जिनिंगमध्ये बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जिनिंगमध्ये लावलेल्या एका कापसाच्या गंजीला अचानक आग लागली. या गंजीत जवळपास तेराशेपेक्षा जास्त क्विंटल कापूस असल्याचे सांगण्यात आले. ही आग लागल्याचे तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या व कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही जिनींग व्यवस्थापनास सांगितले. आग विझवाण्यासाठी आरडाओरडा करत जिनिंगमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्याने व बोअर चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत आगीचे डोंबच्या डोंब वाढत होते. यावेळी जिनींग व्यवस्थापनाने तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थानाला अग्नीशमन गाडी पाठवण्यासाठी विनंती केली. यावर तात्काळ अग्नीशमन बंब घटनास्थळी जिनिंगमध्ये येऊन, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्नीशमन व स्थानिक कामगार, कर्मचारी,उपस्थित शेतकरी यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. माञ या आगीत त्या गंजीतील तेराशे पेक्षा जास्त क्विंटल कापूस जळाला होता. जर वेळीच आग आटोक्यात आली नसती तर लगतच असलेल्या दुसऱ्या गंजीला ही आग लागली. परंतु सर्वांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण आणल्याने इतर नुकसान टळले. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाल्याचे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.
तेलगावजवळील एन.सी.सी.काॅटन जिनिंगमध्ये कापसाच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:03 IST