शेतीचा उत्पादन खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:47+5:302021-06-18T04:23:47+5:30

----------------------------- कोचिंग क्लासेससाठी परवानगीची मागणी अंबाजोगाई : खासगी शिकविण्या सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन खासगी शिकवणी ...

The cost of agricultural production increased | शेतीचा उत्पादन खर्च वाढला

शेतीचा उत्पादन खर्च वाढला

-----------------------------

कोचिंग क्लासेससाठी परवानगीची मागणी

अंबाजोगाई : खासगी शिकविण्या सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. कोरोना कालावधीत बंद असलेले सर्व व्यवसाय आता सुरू होत आहेत. फक्त शिकवणी वर्ग बंद आहेत. त्यामुळे खासगी शिकवणी घेणारे आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

---------------------------

एसटीतील राखीव जागांचा वापर नाही

अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र, या बसेसमधील आरक्षित जागांचा कधीच वापर होत नसल्याचे दिसून येते. एसटी बसेसच्या सीटच्या मागे किंवा बाजूला आरक्षित सीट लिहिलेले असते. यामध्ये आमदार, दिव्यांग व्यक्ती, महिला स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार अशाप्रकारे राखीव सीट असतात; परंतु यांचा वापर होतच नाही.

------------------------

बँकांत दलालांकरवी होतेय फसवणूक

अंबाजोगाई : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. कामे करवून घेण्यासाठी दलालांना पैसे द्यावे लागत असल्याने नागरिक फसत आहेत.

----------------------------

दुग्धव्यवसाय संकटात

अंबाजोगाई : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. परंतु, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्धव्यवसाय डबघाईस आला आहे. १०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी-म्हशी असायच्या. परंतु आता पशुधनात प्रचंड घट झाली आहे.

Web Title: The cost of agricultural production increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.