शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

CoronaVirus : बीडकरांना दिलासा; आष्टीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सहा नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:50 PM

पिंपळा गावातील एकास कोरोनाची लागण

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील सहाजण क्वारंटाईनदिल्लीतून परतलेल्या एकाच्या संपर्कात आल्याने आष्टीत एक पॉझिटिव्ह

बीड :  आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतू त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सहा नातेवाईकांना बीड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पिंपळा येथील दोघे जण जमातसाठी अहमदनगरला गेले होते. यावेळी यातील ६३ वर्षीय व्यक्ती ही त्याच्या बहिणीकडे वास्तव्यास होती. याच जमातमध्ये इतर ठिकाणचे लोकही होते. यातूनच त्यांच्या मेव्हण्याला व बहिणीला कोरोनाची लागण झाली. दोघांनाही रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही व्यक्ती आष्टी तालुक्यातील पिंपळा या मुळ गावी आली. ते दोघे बीडला आल्याचे समजताच बीड प्रशासनाने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यातील एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला तर दुसºयाचा निगेटिव्ह आला होता. एकजण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

दरम्यान, दोघांच्याही संपर्कात असलेल्या दोघांच्याही पत्नी, मुलगा व इतर नातेवाईक अशा सहा लोकांना लोकांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्या सगळ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. त्यात सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली. यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

एका दिवसांत २१०३ घरांचे केले सर्वेक्षणकोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच पिंपळ्यासह परिसरातील सात कि.मी.चा परिसर बंद करण्यात आला आहे. जवळपास आठ गावे लॉक केली असून सर्व प्रशासन तेथे तळ ठोकून आहे. तसेच एका दिवसांत २४ पथकांद्वारे २१०३ घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात ९ हजार ४७६ लोकांची तपासणी केली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

स्वॅब औरंगाबादला गेल्याने अहवालास उशिरआतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. परंतु आता यापुढे बीडसाठी औरंगाबादची प्रयोगशाळा असणार आहे. पहिल्यांदाच इकडे स्वॅब गेल्याने उशिर झाला आहे. आता यापुढे लवकरात लवकर अहवाल प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड