CoronaVirus : नाते जुळले क्वारंटाइनशी; बरं झालं इथं ठेवलं.. गावात कुणी घेतलंही नसतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 07:01 PM2020-04-14T19:01:40+5:302020-04-14T19:04:14+5:30

वासनवाडी येथील जय संतोषी माता सेवाभावी संस्थेच्या निवासी मतिमंद विद्यालयामधील संस्थात्मक अलगीकरण कक्षातील नागरिकांच्या प्रतिक्रिया

CoronaVirus: Relationship with Quarantine; Well, it was kept here, quarantine people's opinions in Beed | CoronaVirus : नाते जुळले क्वारंटाइनशी; बरं झालं इथं ठेवलं.. गावात कुणी घेतलंही नसतं

CoronaVirus : नाते जुळले क्वारंटाइनशी; बरं झालं इथं ठेवलं.. गावात कुणी घेतलंही नसतं

Next
ठळक मुद्देमिष्टान्न भोजनाची मेजवानी, योगाचे धडे, कीर्तनाचे आयोजनसोशल डिस्टन्समध्येही उत्तम व्यवस्थापन

-अनिल भंडारी
बीड : चांगलं केलं इथं ठेवलं..गावात कुणी घेतलं नसतं अन् जेवणही भेटलं नसतं आज खूप छान वाटतं, अशी प्रतिक्रि या वासनवाडी येथील जय संतोषी माता सेवाभावी संस्थेच्या निवासी मतिमंद विद्यालयामधील संस्थात्मक अलगीकरण कक्षातील नागरिकांनी व्यक्त केली. 

२९ मार्च रोजी मुखेड,  लातूर, उदगीर, अंबड, उमरगा आदी भागातील या नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. यात उसतोड मजुर, मजुरी काम करणारे स्थलांतरीत श्रमिक तसेच काही नोकरदारही आहेत. सुरु वातीचे एक-दोन दिवस तजवीज करण्यातच गेले त्यामुळे काही किरकोळ अडचणी आल्या. मात्र त्यानंतर कक्षातील नागरिकांची सोय करताना कुठलीही कसर ठेवली नाही. सकाळी पोहे, शिरा, उपमा, दूध, चहा तर दोन वेळचे जेवण, टूथपेस्ट, ब्रश, मास्क, साबण, गाद्या अगदी वºहाडींप्रमाणे आदरातिथ्य सुरु आहे.  सर्व सुविधा प्रशासन, विद्यालयाचे कर्मचारी, सहकारी मित्रांच्या मदतीने उपलब्ध केल्याचे कक्ष व्यवस्थापन सांभाळणारे बबनराव शिंदे म्हणाले. वस्तुंचे वाटप असेल किंवा अन्य काहीही सामाजिक अंतर ठेवून नियमानुसार व्यवस्था केल्याचे ते म्हणाले. 

योगाचेही धडे
या अलगीकरण कक्षात ९६ लोकांचा समावेश आहे यात २८ महिला आहेत. त्यांना बबनराव शिंदे यांनी योगाचे धडेही दिले. आपल्या मानिसक शांततेसाठी योगाची गरज कशी आहे हे प्रात्यक्षिकाद्वारे पटवून सांगताना त्यांच्याकडून योगासनेही करून घेतली. सुरेश महाराज जाधव यांनी कीर्तनसेवा करीत आत्मबल वाढविले. क्वारंटाईनमधील लोकांनाही हा अनुभव वेगळाच होता. 

दोन आठवड्यात चार वेळा मिष्टान्न भोजन
चौदा दिवसात चार वेळा मिष्टान्न भोजनाचा स्वाद या अलगीकरण कक्षातील नागरिकांनी चाखला. बासुंदी, गुलाब जामुन, गोड बुंदी, बालुशाही, दूध खीर आणि खमंग भजे असा बेत होता. क्वारंटाईन व्यक्तींबरोबरच अधिकाºयांनीही पाहणी दरम्यान भोजनाचा स्वाद घेतला. अशा सुविधा अनुभवल्यानंतर येथील क्वारंटाईनच्या तक्र ारींचा सूरच मावळला होता. गेल्या पंधरा दिवसात झालेला हा बदल प्रशासनाच्या दृष्टीने समाजमने जोडणारा ठरला आहे.

देवांचीच सेवा
 ‘तुम्हाला मुद्दामहून येथे बंद केलेले नाही. सरकार तुमची काळजी घेतंय. प्रशासन तुमची काळजी घेतंय. शांत रहा, सहकार्य करा, तुम्ही समजून घ्या, इथेच राहा’अशी समजुत घालत आपल्या सेवा कार्यातून शिंदे यांनी अलगीकरण कक्षातील लोकांची मने जिंकली. यातून निर्माण झालेला विश्वास आणखी दृढ झाला. सुटीच्या वेळी क्वारंटाईन महिला भगिनींना साडी तर पुरुषांना शर्टचे कापड आहेर करण्यासाठी घेऊन ठेवल्याचे सांगत दोन आठवडे रोज १०० जणांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल बबनराव शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

सुरुवातीला तक्रारी.. आता कौतुक
घरी जाण्याची ओढ आणि प्रशासनाकडून रोखल्याने क्वारंटाईन व्यक्ती नाराज होते. सुरुवातीचे तीन- चार दिवस केवळ तक्र ारीच असायच्या. मात्र सर्व बाबी समजल्या आणि मिळणाºया सुविधांमुळे तक्र ारीचा पाढा बंद झाला. या कक्षांना भेट देत वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करतो. आता क्वारंटाईनमधील व्यवस्थेचे ते कौतुक करतात.
 - किरण अंबेकर, तहसीलदार, बीड.

Web Title: CoronaVirus: Relationship with Quarantine; Well, it was kept here, quarantine people's opinions in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.