शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

Coronavirus: दारूसाठी क्वारंटाईन व्यक्तीची वसतिगृहाच्या कपाऊंडवरून उडी; पत्नीस मारहाण केल्याने आले उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:46 IST

मारहाण झालेल्या महिलेने सांगितली व्यथा

ठळक मुद्देदारू पिण्यासाठी जवळपास 10 फुट उंच कंपाउंडवरून उडी

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : परजिल्ह्यातील साखर कारखान्यावरून आलेल्या ऊसतोड कामगारांना केसापुरी कॅम्प येथील वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. मात्र, यातील काहीजण दारू पिण्यासाठी वसतिगृहाच्या जवळपास १० फूट उंच कंपाउंडवरून उडी मारून बाहेर जात असून यातील एकाने दारू पिऊन आपल्या पत्नीस मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराची प्रशासन व पोलिसांना दोन दिवसानंतर देखील भनक नव्हती.

माजलगाव तालुक्यातील रेणापूरी , फुले पिंपळगाव , शेलापुरी ,ब्रम्हगाव , वडगाव आदी गावातून नागपुर जिल्ह्यात उसतोडणीसाठी गेलेले 59 कामगार तालुक्यात परतले आहेत. त्यांना केसापुरी कॅम्प वसाहतीजवळ शासकीय मुलींच्या वस्तीगृहात 22 एप्रिल रोजी क्वारंटाईन करण्यात आले. यातील अनेकजण दारू पिण्यासाठी हॉस्टेलच्या जवळपास 10 फुट उंच कंपाउंडवरून उडया मारून बाहेर जात असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितले. दरम्यान, राजेश अनभुले (रा.वडगाव) याने अशाच प्रकारे बाहेर पडून दारू पिऊन येत आपल्या पत्नीस मारहाण केल्याची माहिती  सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी दिली आहे. 

10 फुट उंच कंपाउंडवरून उडी मारून क्वारंटाईन केलेले नागरिक बाहेर जात आहेत. यात काही बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण राहील ?-- सत्यभामा सौंदरमल , सामाजिक कार्यकर्त्या 

सदरील घटना शनिवारी झाली होती. त्या व्यक्तीला समज देण्यात आला असुन यापुढे त्याने असा प्रकार केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे.-- सुरेश बुधवंत , पोलीस निरीक्षक , माजलगाव शहर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड