शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

coronavirus : दिल्लीहून एकजण बीडला आला; पण ‘त्या’ कार्यक्रमाशी संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 6:18 PM

दिल्ली येथे गेलेली व्यक्ती मंत्रालयात कामानिमित्त गेली होती

बीड : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातील सहभागी लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातीलही लोक सहभागी झाले होते. बीडचेही लोक सहभागी झाल्याचा संशय होता. परंतु मागील महिनाभरात केवळ एक व्यक्ती दिल्लीहून बीडला आला असून त्याचा या कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दिल्ली येथील संमेलनात देश-विदेशातील मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. महाराष्ट्रातीलही लोकांची नावे समोर आली होती. त्यातच बीडचे काही लोक असल्याचे समोर आल्याने बीडकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांनी अधिकृत पाच लोकांची यादी आरोग्य विभागाला देत खात्री करण्यास सांगितले. पैकी चौघे हे बीड जिल्ह्यातील नसल्याचे सांगण्यात आले. तर एक व्यक्ती हा १२ मार्चला दिल्ली येथे गेला होता. परंतु तो त्या धार्मिक कार्यक्रमात न जाता मंत्रालयात कामानिमित्त गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाशी संबंधित एकही व्यक्ती बीडमध्ये आतापर्यंत आढळला नसल्याचे पोलीस, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सापडलेल्या एकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले असून स्वॅबही तपासणीस पाठविला आहे. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नयेपोलिसांकडून पाच लोकांची यादी आली होती. खात्री केली असता चार लोक हे बीडचे नसून एक व्यक्ती हा दिल्लीत गेला होता, परंतु कार्यक्रमात हजेरी न लावता मंत्रालयात कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. संशय म्हणून त्यालाही आयसोलेशनमध्ये दाखल केले असून स्वॅब तपासणीला पाठविला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काळजी घ्यावी. - डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड